Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंदजी महाराज यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंदजी महाराज यांच्या प्रकृतीची केली विचारपूस


नवी दिल्‍ली, 5 मार्च 2024 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील रुग्णालयात जाऊन रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

एक्स या समाजमाध्यमांवर पंतप्रधानांनी पोस्ट केले:

“कोलकाता येथे पोहोचल्यावर, रुग्णालयात जाऊन रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष, श्रीमत स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत उत्तम सुधारणा व्हावी यासाठी आपण सर्व प्रार्थना करत आहोत.”

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai