Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लॉकहीड मार्टिन कंपनीच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ उपक्रमाप्रती वचनबद्धतेची पंतप्रधानांनी केली प्रशंसा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील सामग्री उत्पादन करणारी प्रमुख कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टिन कंपनीच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ उपक्रमाप्रती वचनबद्धतेची प्रशंसा केली आहे.
लॉकहीड मार्टिन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम टायक्लेट यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
@LockheedMartin चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम टायक्लेट पंतप्रधान @narendramodi यांना भेटले. लॉकहीड मार्टिन ही कंपनी भारत-अमेरिका अंतराळ तसेच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्यविषयक महत्त्वाची भागीदार कंपनी आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ उपक्रमाप्रती या कंपनीने दर्शवलेल्या वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो.” 

***

SushamaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai