पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2024
आम्ही, आसियान अर्थात आग्नेय आशियाई देशांची संघटनेचे (ASEAN) सदस्य राष्ट्रे आणि भारत प्रजासत्ताक, 10 ऑक्टोबर 2024 रोजी लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक मधील व्हिएन्टिआन येथे 21 व्या आसियान – भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत;
मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांद्वारे मार्गदर्शित आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत. या संघटनेने 1992 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच आसियान – भारत संवाद संबंधांना चालना दिली आहे. आसियान – भारत 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिखर परिषदेचे (2012) दृष्टिकोन निवेदन, आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान -भारत शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत आसियानच्या दृष्टिकोनाच्या (AOIP) संदर्भात या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यासंदर्भात आसियान-भारत संयुक्त निवेदन (2023) तसेच संकट काळाच्या प्रतिसादाच्या रुपात अन्न सुरक्षा आणि पोषण बळकटीकरणावर आसियान – भारत नेत्यांचे संयुक्त निवेदन (2023) यामध्ये नमूद करण्यात आलेली मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांद्वारे देखील ही धोरणात्मक भागीदारी मार्गदर्शित आहे.
भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या दशकपूर्तीचे स्वागत करत आहोत, आसियान देश या धोरणाच्या केंद्रस्थानी असून त्यांना सर्वोच्च प्राधान्य आहे. यामुळे राजकीय-सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक तसेच नागरिकांचे परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्याद्वारे आसियान-भारत संबंधांना आणखी दृढ बनवण्यात योगदान दिले आहे;
आग्नेय आशिया आणि भारत यांच्यात जमीन आणि हिंद – प्रशांत क्षेत्रामधील अनेक समुद्र आणि महासागरांचा समावेश असणाऱ्या सागरी मार्गांद्वारे, आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीसाठी मजबूत पाया प्रदान करून, दृढ सभ्यता संबंध आणि परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाण सुनिश्चित करण्यात आली आहे;
आसियान – भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ॲक्ट ईस्ट धोरणाच्या दशकपूर्ती निमित्त वर्ष 2024 मध्ये आयोजित केलेल्या उपक्रमांचे आणि आयोजनांचे स्वागत करत आहोत;
या क्षेत्रात विकसित होत असलेल्या प्रादेशिक परस्पर संबंधात, आसियानची मध्यवर्ती भूमिका आणि एकतेसाठी भारताचा पाठिंबा सुनिश्चित करणे तसेच आसियान नेतृत्वाखालील यंत्रणा आणि मंचांद्वारे जवळून काम करण्याची वचनबद्धता सुनिश्चित करणे. यामध्ये आसियान नेतृत्वाखालच्या पुढील यंत्रणांचा समावेश आहे : आसियान – भारत शिखर परिषद ; पूर्व आशिया शिखर परिषद (EAS); भारताबरोबर पोस्ट मंत्रिस्तरीय परिषद (PMC+1); आसियान प्रादेशिक मंच (ARF), आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM-Plus) आणि विस्तारित आसियान सागरी मंच (EAMF) तसेच आसियान एकात्मता आणि आसियान समुदाय बांधणी प्रक्रिया यासह आसियान संपर्क सुविधा 2025 साठी प्रारुप आराखडा (MPAC); आसियान एकात्मतेसाठी उपक्रम (IAI) तसेच हिंद – प्रशांत क्षेत्राबाबत आसियानच्या दृष्टिकोनासाठी (AOIP) उपक्रम.
संयुक्त राष्ट्र आम सभा (UNGA) चां ठराव A/RES/78/69, ज्याच्या प्रस्तावनेत, 1982 मध्ये आयोजित समुद्राच्या कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन (UNCLOS) च्या सार्वत्रिक आणि एकात्म वैशिष्ट्यावर जोर देण्यात आला आहे, त्याची दखल घेत आहोत. तसेच कायदेशीर चौकट निश्चित करण्याच्या अधिवेशनाच्या ठरावाची पुष्टी करत आहोत. ज्यात या कायदेशीर चौकटीनुसार महासागर आणि समुद्रातील सर्व क्रिया होणे आवश्यक आहे तसेच या कायदेशीर चौकटीला राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक कृती आणि सागरी क्षेत्रातील सहकार्याचा आधार म्हणून धोरणात्मक महत्त्व आहे, म्हणून त्याची अखंडता राखली जाणे आवश्यक आहे.
सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित विश्वास आणि आत्मविश्वास, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर दृढ विश्वास याद्वारे प्रदेशातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी हिंद – प्रशांत क्षेत्राबाबत आसियान दृष्टिकोनसंदर्भात सहकार्यावरील आसियान-भारत संयुक्त निवेदनाच्या अंमलबजावणीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत आहोत तसेच कायद्याचे राज्य आणि संयुक्त राष्ट्रांच्या संसदेत नमूद तत्त्वांप्रती सामायिक वचनबद्धता दर्शवत आहोत;
उदयोन्मुख बहुध्रुवीय जागतिक परस्पर संबंधात आसियानची वाढती जागतिक प्रासंगिकता आणि अद्वितीय संयोजक शक्ती ओळखून तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय घडामोडी क्षेत्रात भारताची वाढती आणि सक्रिय भूमिका लक्षात घेऊन बहुपक्षवाद, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये अंतर्भूत केलेली उद्दिष्टे आणि तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत.
याद्वारे घोषित करत आहोत:
* * *
S.Tupe/Shraddha/Nandini/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Sharing my remarks at the India-ASEAN Summit.https://t.co/3HbLV8J7FE
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2024
The India-ASEAN Summit was a productive one. We discussed how to further strengthen the Comprehensive Strategic Partnership between India and ASEAN. We look forward to deepening trade ties, cultural linkages and cooperation in technology, connectivity and other such sectors. pic.twitter.com/qSzFnu1Myk
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2024
Proposed ten suggestions which will further deepen India’s friendship with ASEAN. pic.twitter.com/atAOAq6vrq
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2024