पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ ( फिक्की) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आणि वार्षिक संमेलनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
‘भारत 2047’ या संकल्पनेवर आधारित या अधिवेशनात उद्योग क्षेत्रातील धुरीण , मुख्य कार्यकारी अधिकारी , राजदूत, राजनैतिक अधिकारी आणि धोरणकर्त्यांसह अडीच हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 2026-27 हे वर्ष फिक्कीचे शताब्दी वर्ष आहे, कारण 7 एप्रिल , 2027 रोजी फिक्की आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करेल.
1927 मध्ये स्थापन झालेली फिक्की अशा काळात अस्तित्वात आली, जेव्हा आर्थिक धोरण निर्मितीमध्ये भारतीय उद्योगांचे प्रतिनिधित्व अत्यंत मर्यादित होते. स्वातंत्र्यानंतर फिक्की भारताच्या आर्थिक परिवर्तन आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी देशाच्या वाढत्या एकीकरणात सहभागी आहे.
आज, ‘फिक्की’ सार्वजनिक, खाजगी आणि बहुराष्ट्रीय क्षेत्रांतील अडीच लाखांहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते; हे प्रतिनिधित्व थेट किंवा 300 हून अधिक संलग्न प्रादेशिक आणि राज्यस्तरीय उद्योग संघटनांच्या माध्यमातून केले जाते. तसेच, 100 हून अधिक देशांमधील 250 राष्ट्रीय व्यावसायिक संघटनांशी फिक्कीचे भागीदारी करार देखील आहेत.
***
Shailesh Patil / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai