Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा गयानाच्या ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ या पुरस्काराने झाला सन्मान


नवी दिल्‍ली, 21 नोव्‍हेंबर 2024

गयानाच्या संसद सभागृहात आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला. दूरदर्शी राजकीय नेतृत्व, जागतिक स्तरावर विकसनशील देशांच्या अधिकारांचा पुरस्कार, जागतिक समुदायाची असामान्य सेवा आणि भारत-गयाना संबंधांना बळकटी देण्याची वचनबद्धता याबद्दल पंतप्रधानांचा बहुमान करण्यात आला.

पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारताना, तो भारताच्या जनतेला आणि दोन्ही देशांमध्ये अतिशय खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला. आपला सरकारी दौरा म्हणजे भारत-गयाना मैत्रीला दृढ करण्याच्या दिशेने भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला.

गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील केवळ चौथे परदेशी नेते आहेत.   

* * *

JPS/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai