Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि भारताच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.

या दिनानिमित्त आपल्या एक्स पोस्टवर सामायिक केलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. भारतातील सर्वात आदरणीय आध्यात्मिक नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक म्हणून त्यांचे नेहमीच स्मरण केले जाते. त्यांनी आपले जीवन गांधीवादी आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी समर्पित केले होते. विकसित भारत उभारण्याच्या प्रयत्नात त्यांचे विचार आपल्याला खूप प्रेरणा देतात.”

***

AshishSangle/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai