Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट समिटसाठी दिल्लीत आलेल्या जागतिक नेत्यांचे स्वागत केले


नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एआय इम्पॅक्ट समिटसाठी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आलेले जागतिक नेते, उद्योगजगतातील अग्रणी, धोरणकर्ते, संशोधक आणि जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील तंज्ञांचे स्वागत केले.

या परिषदेची संकल्पना “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय – सर्वांच्या क्षेमकल्याणासाठी ए आय, सर्वांच्या आनंदासाठी ए आय” अशी आहे. यातून मानवकेंद्रित प्रगती आणि सर्वसमावेश विकासाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याची भारताची वचनबद्धता दिसून येते.

पंतप्रधानांनी आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी भूमिकेला अधोरेखित केले. या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून नवोन्मेष, सहयोग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार उपयोग याविषयीच्या जागतिक चर्चेत मोलाची भर पडेल आणि एका प्रगतिशील, नवोन्मेषी आणि संधींवर आधारित भविष्याला आकार मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनातील भारताचे  नेतृत्त्व अधोरेखित करुन सांगितले की आपल्या 140 कोटी जनतेचे सामर्थ्य, मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवा, चैतन्यशील स्टार्टअप परिसंस्था आणि अत्याधुनिक संशोधन यांच्या बळावर भारत हे नेतृत्व करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमधील भारताच्या प्रगतीमधून  महत्त्वाकांक्षेबरोबरच जबाबदारीचे दर्शन घडते देशाला तंत्रज्ञानातील प्रगतीच्या अग्रस्थानी विराजमान करते.

 एक्स समाज माध्यमावरील थ्रेड पोस्ट सामायिक करताना पंतप्रधानांनी लिहिले आहे:

 “कृत्रिम बुद्धिमत्तेवर विचारविनिमय करण्यासाठी जगाला समीप आणत आहोत!”

भारत आजपासून नवी दिल्ली येथे सुरु झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवत आहे. मी सर्व जागतिक नेते, उयोगजगतातील अग्रणी, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधन आणि जगभरातून आलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रज्ञावंताचे मनापासून स्वागत करतो. या परिषदेची संकल्पना “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय – सर्वांच्या क्षेमकल्याणासाठी ए आय, सर्वांच्या आनंदासाठी ए आय” अशी असून मानव केंद्रित प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबद्दलची भारताची वचनबद्धता यातून दिसून येते.

“कृत्रिम बुद्धिमत्ता आज आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, प्रशासन आणि उयोजकता यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून नवोन्मेष, सहयोग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार उपयोग याविषयीच्या आणि त्याहीपलीकडे जागतिक चर्चेत मोलाची भर पडेल. या परिषदेतून होणारी फलनिष्पत्ती एका प्रगतिशील, नवोन्मेषी आणि संधींवर आधारित भविष्याला साकार करेल, असा मला विश्वास आहे.”

“भारतातील 140 कोटी लोकांचे मनापासून आभार, भारत आज कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनाच्या अग्रस्थानी उभा आहे. मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सेवेपासून चैतन्यशील स्टार्टअप परिसंस्था आणि अत्याधुनिक संशोधन या सर्वांमधून एआय क्षेत्रातील आमची प्रगती ही आमच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच जबाबदारीची जाणीवही दर्शवते.”

* * *

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai