Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिशन दृष्टीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले गॅलेक्सआयचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 3 मे 2026

 

मिशन दृष्टीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्सआय या कंपनीच्या संस्थापकांचे आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.

गॅलेक्सआयचे मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतले एक मोठे यश असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. जगातील पहिल्या ऑप्टोसॅर (OptoSAR) उपग्रहाचे आणि भारतातील सर्वात मोठ्या खाजगीरित्या  निर्मित उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ही आपल्या युवा वर्गातील नवोन्मेष आणि राष्ट्र उभारणीच्या संकल्पाचाच दाखला  आहे असेही पंतप्रधांनी म्हटले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी गॅलेक्सआयच्या संस्थापकांना आणि संपूर्ण चमूला शुभेच्छाही दिल्या आहेत.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

गॅलेक्सआयचे मिशन दृष्टी हे आपल्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतले एक मोठे यश आहे. जगातील पहिल्या ऑप्टोसॅर उपग्रहाचे आणि भारतातील सर्वात मोठ्या खाजगीरित्या निर्मित उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, म्हणजे आपल्या युवा वर्गातील नवोन्मेष आणि राष्ट्र उभारणीच्या संकल्पाचा दाखला  आहे. गॅलेक्सआयच्या संस्थापकांचे आणि संपूर्ण चमूचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai