Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि नवीन जागतिक विक्रम रचल्याबद्दल संदीप कुमार याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा खेळांमध्ये पुरुषांच्या 400 मीटर T64 स्पर्धेत नवीन जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावून केलेल्या उत्कृष्ट पदार्पणाबद्दल संदीप कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. हे पदक आशियाई पॅरा खेळांमधील भारताचे 100 वे पदक ठरल्याने हा क्षण अधिक विशेष बनला आहे.

त्याची ही कामगिरी देशासाठी एक अभिमानास्पद टप्पा आहे, असे मोदी यांनी सांगितले. तसेच त्यांनी संदीप कुमारने भविष्यातही भारताचे नाव असेच उज्ज्वल करत राहावे अशी आशा व्यक्त केली.

एक्सवरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेः

“भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी एक सुवर्ण क्षण! पुरुषांच्या 400 मीटर T64 स्पर्धेत नवीन जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल संदीप कुमार याचे अभिनंदन. पदार्पणातच केलेली ही उत्कृष्ट कामगिरी आशियायी पॅरा खेळांमधील भारताचे 100 वे पदक ठरल्याने अधिक विशेष बनली आहे. त्याने देशासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी यापुढे करत रहावी: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai