Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नवीन शिवकुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या पुरुष एकेरी SL4 प्रकारात सुवर्णपदक जिंकून संस्मरणीय पदार्पण करणाऱ्या नवीन शिवकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

नवीन शिवकुमार यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाचा गौरव वाढला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच, त्यांनी भविष्यातही नवनवीन यशाची शिखरे गाठावीत आणि सहकारी खेळाडूंना प्रेरणा द्यावी, अशी आशा व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील  संदेशात म्हटले आहे :

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत नवीन शिवकुमार यांचे संस्मरणीय पदार्पण!

पुरुष एकेरी SL4 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाचा गौरव वाढला आहे. त्यांनी भविष्यातही नवनवीन यशाची शिखरे गाठावीत आणि सहकारी खेळाडूंना प्रेरणा देईल, अशी आशा आहे : PM @narendramodi.”

 

* * *

राधिका अघोर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai