Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हैदराबाद इथल्या सिंधू रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये ‘सिंधू रुग्णालयाचे’ उद्घाटन केले. हे रुग्णालय, हैदराबाद शहर आणि आसपासच्या परिसरातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने उचललेले एक कौतुकास्पद पाऊल आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच, रुग्णालयाच्या व्यवस्थापन व वैद्यकीय चमूने उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धतींच्या वापराला दिलेल्या विशेष प्राधान्याचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.

X या समाजमाध्यमावरच्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,

“हैदराबादमध्ये सिंधू रुग्णालयाचे उद्घाटन केले. शहरात आणि लगतच्या भागात आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठीचा हा एक अतिशय कौतुकास्पद प्रयत्न आहे. रुग्णालयाच्या चमूने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवसंशोधनाचा मेळ घालण्यावर दिलेला भर नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.”

***

राधिका अघोर/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com