Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या शक्तीवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले


नवी दिल्ली, 27 मे 2026

सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि दृढ निश्चयाने मोठी ध्येयेही साध्य करता येतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे. आज देशातील जनता याच मार्गदर्शनाने प्रेरित होऊन भारताला नव्या उंचीवर नेत आहे.

पंतप्रधानांनी हे संस्कृत सुभाषित सामायिक केले –

“यो यमर्थं प्रार्थयते तदर्थं चेह ते क्रमात् ।

अवश्यं स तमाप्नोति न चेदर्थान् निवर्तते ।।”

या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, जी व्यक्ती एखाद्या विशिष्ट ध्येय प्राप्त करण्याची इच्छा   ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्न करते, तसेच मार्गात अर्धवट हार न मानता आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही,  ती व्यक्ती निश्चितच आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचते.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले –

निरंतर प्रयत्न, धैर्य आणि दृढ़ निश्चय केल्याने सर्वात मोठे लक्ष्य मिळू शकते. आज देशातील जनता याच मार्गदर्शनाने  प्रेरित होऊन भारताला नव्या उंचीवर नेत आहे.

यो यमर्थं प्रार्थयते तदर्थं चेह ते क्रमात् ।

अवश्यं स तमाप्नोति न चेदर्थान् निवर्तते ।।”

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com