पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील चेन्नई इथे 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि तामिळनाडूतील जनतेचे त्यांनी आपल्या संबोधनातून स्वागत केले. तामिळनाडूसारख्या बहुआयामी राज्यात आपण भाषण करत असल्याचा आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आजच्या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्वही त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या कार्यक्रमात 13 हजार कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्ण झालेल्या आणि येत्या काळात पूर्ण होणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल, तसेच उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल आणि राज्यातील युवा वर्गासाठी रोजगाराच्या अफाट संधी निर्माण होतील असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले.
आजपासून सुरु होत असलेल्या पावन नवरात्रोत्सवाचा उल्लेख त्यांनी केला आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्वही अधोरेखित केले. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आपण जलाकंडेश्वरर मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू ही शिव आणि शक्ती या दोघांचीही पवित्र भूमी असल्याचे ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी तीर्थक्षेत्रांचे राज्य असलेल्या तामिळनाडूतून देशवासीयांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या भारतरत्न जयप्रकाश नारायण आणि भारत रत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजलीही वाहिली. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या अद्वितीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही केला. या महापुरुषांनी आयुष्यभर केलेल्या समर्पणातून अधिक निष्ठेने देशसेवा करण्याची प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांना वंदनही केले.
पंतप्रधानांनी आपल्या पूर्वीच्या दौऱ्यातील अनुभव सांगताना आयआयटी मद्रास येथील मेंदू संशोधन केंद्राला दिलेल्या भेटीचा उल्लेख केला. या अग्रगण्य संस्थेच्या संशोधनात सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण प्रगती घडवून आणण्याची क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. चेन्नई मेट्रोच्या एका नवीन मार्गाचे लोकार्पण झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. “या भेटीत मला चेन्नई मेट्रोचा आणखी एक मार्ग जनतेला समर्पित करण्याची संधी मिळाली,” असे मोदी म्हणाले.
आध्यात्मिकता आणि आधुनिक विकास यांच्यात साम्य दर्शवत, पंतप्रधानांनी असे निरीक्षण नोंदवले की प्राचीन मंदिरे आणि आधुनिक मेट्रो या दोन्हींचा अनुभव यातून समकालीन भारताचे खरे स्वरूप दिसून येते. देश आपल्या सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत आणि त्याच वेळी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत वेगाने प्रगती करत आहे, असे त्यांनी सांगितले. “आपला वारसा आणि भविष्यासाठीच्या आपल्या आकांक्षा एकत्र पुढे जात आहेत,” हे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या दीर्घ राजकीय प्रवासाबाबत बोलताना पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2001 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिली शपथ घेतल्यापासून सरकार प्रमुख म्हणून सलग 25 वर्षे पूर्ण केल्याच्या महत्वपूर्ण टप्प्याचा उल्लेख केला. राष्ट्राच्या सेवेतील आपल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवाने लोकशाहीतील जनतेच्या शक्तीवर आणि सहकारी संघराज्याच्या मूलभूत चौकटीवर आपला दृढ विश्वास अधिक पक्का केला आहे, असेही ते म्हणाले. “राज्याच्या विकासातून देशाचा विकास करण्याच्या मंत्रानुसार मी नेहमी पुढे वाटचाल केली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
राज्य पातळीवरील त्यांच्या कार्यकाळाने त्यांच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाला कसा आकार दिला हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी नमूद केले की मुख्यमंत्री म्हणून काम केल्यामुळे त्यांना राज्य पातळीवरील अपेक्षा समजून घेता आल्या. “त्यामुळे पंतप्रधान झाल्यावर आपण केवळ त्या आकांक्षा पूर्ण करण्याचाच प्रयत्न केला नाही, तर प्रत्येक राज्य आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करू शकेल याची खात्री करण्याचाही प्रयत्न केला,” हे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात करुणानिधी आणि जयललिता यांच्यासारख्या दिग्गजांसोबत झालेल्या फलदायी संवादांची आणि पंतप्रधान म्हणून ओ. पनीरसेल्वम, एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांसोबत सुरू ठेवलेल्या सहकार्याचे स्मरण केले. सरकार बदलले तरी तामिळनाडूच्या विकासाप्रति आपली वचनबद्धता दृढ राहिली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. आता विद्यमान मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबत काम करतानाही आपला तोच अढळ निर्धार आहे, असेही ते म्हणाले. “मुख्यमंत्री जोसेफ विजयजी यांच्यासोबत मिळून आम्ही तामिळनाडूच्या विकासाचा हा प्रवास पुढे नेत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
शहरीकरणाला विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग मानून पंतप्रधानांनी तामिळनाडूतील शहरी विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. शहरी विस्ताराकडे आव्हान म्हणून नव्हे, तर एक प्रचंड संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. या विस्ताराला भक्कम सार्वजनिक वाहतुकीचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले. “जर वाहतूक व्यवस्था चांगली असेल, तर लोकांचे जीवनमान सुलभ होते,” असेही ते म्हणाले.
सर्वसमावेशक शहरी नियोजनाच्या गरजेवर भर देताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की केवळ रस्ते रुंद करणे पुरेसे नाही, तर आधुनिक शहरांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण नियोजनाची आवश्यकता आहे. गेल्या दशकात देशभरात मेट्रो रेल्वे जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “2014 मध्ये मेट्रो रेल्वे सेवा केवळ 5 शहरांपुरती मर्यादित होती, तर आज देशातील 25 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे.”
पायाभूत सुविधांच्या या वेगवान विस्ताराची आकडेवारी मांडताना पंतप्रधानांनी सांगितले की देशातील मेट्रो रेल्वे जाळ्याची लांबी 2014 मध्ये सुमारे 250 किलोमीटर होती, ती आता 1,100 किलोमीटरपेक्षा अधिक झाली आहे. चेन्नई मेट्रोच्या अलीकडील विस्तारामुळे या जाळ्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “चेन्नईतील सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि त्यांना कमी वेळेत प्रवास करता यावा, यासाठी हे काम करण्यात आले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
देशांतर्गत उद्योगांच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधानांनी सांगितले की राज्यांना सक्षम करणे हाच संपूर्ण देशाला सक्षम करण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकार तामिळनाडूमध्ये उत्पादन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. राज्यातील लघुउद्योग आणि तेथील कामगार वर्गाचे कौतुक करताना त्यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांमुळे स्थानिक उद्योगांना मोठा लाभ होत असल्याचे नमूद केले. “तामिळनाडूचे उत्पादन क्षेत्र, येथील लघुउद्योग आणि त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
देशाच्या औद्योगिक धोरणांच्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की सुट्या भागांपासून ते अंतिम तंत्रज्ञान उत्पादनांपर्यंत संपूर्ण उत्पादन साखळी मजबूत केल्यामुळे भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. 2014 पासून झालेल्या प्रगतीची आकडेवारी मांडताना त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 11 पट वाढ झाल्याचे सांगितले. “आपल्या संरक्षण साहित्याच्या निर्यातीत 50 पट वाढ झाली आहे, तर अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीनेही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.
औद्योगिक विस्ताराचा थेट संबंध युवकांच्या सक्षमीकरणाशी जोडताना पंतप्रधानांनी सांगितले की उत्पादन क्षेत्रातील या मोठ्या वाढीमुळे देशभरात लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत. यामध्ये तामिळनाडूचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. यावेळी त्यांनी प्रगत वंगण निर्मितीसाठीच्या वंगण तेलाच्या मूलभूत घटकाच्या तेल निर्मीती प्रकल्पाची पायाभरणी केल्याची घोषणा केली. “या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि देशाची आयात कमी करण्यास मोठी मदत होईल,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
पायाभूत संरचना आणि उद्योग यांच्यातील परस्पर सहसंबंधांविषयी बोलताना पंतप्रधानांनी कच्च्या मालाची कार्यक्षमतेने वाहतूक करताना उच्च गुणवत्तेचे रस्ते, रेल्वे आणि बंदरे ही बळकट उत्पादन क्षेत्राची मूलभूत गरज असते, यावर भर दिला. “जेव्हा अशा पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर विविध पातळ्यांवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात,” असे मोदी यांनी नमूद केले.
या विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक साखळी प्रक्रियेचे तपशील देताना, मोदी यांनी, बांधकाम प्रकल्पांमुळे अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगार यांना ताबडतोब रोजगार उपलब्ध होतो आणि त्याच वेळी सिमेंट, स्टील आणि साधन सामग्री उत्पादन करणाऱ्या लहान आस्थापना आणि कारखान्यांना चालना मिळत असल्याचे नमूद केले. आजचे रेल्वे आणि रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, निर्माण होणारे सुधारित दळणवळण तामिळनाडूच्या औद्योगिक आणि सेवा क्षेत्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच आज ज्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी झाली आणि ज्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले ते तामिळनाडूच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मोदींनी नमूद केले.
सागरी दळणवळण व्यवस्थेच्या धोरणात्मक आधुनिकीकरणावर लक्ष केंद्रित करताना, पंतप्रधानांनी, जहाज वाहतूक क्षेत्राला अभूतपूर्व उंची गाठण्यासाठी देशातील बंदराच्या पायाभूत संरचनांना बळकटी दिली जात आहे आणि त्यामध्ये तामिळनाडू प्रमुख भूमिका बजावत आहे , असे सांगितले. त्यांनी, थुथुकुडी इथल्या व्हीओसी बंदराचे जागतिक मेगा कंटेनर आणि हरीत उर्जा केंद्रात रूपांतरीत करण्यासाठी जवळपास 17000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. हे बंदर अति मोठ्या साठवण जहाजांना सामावून घेण्यास सक्षम असेल. “यामुळे तामिळनाडू उद्योग आणि वाहतुकीचे केंद्र होण्यास मदत होणार आहे, ” असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
सागरी धोरणाचे कार्यात्मक यश अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी अलीकडच्या काळात भारतीय बंदराची गती आणि कार्यक्षमता यांच्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की जहाजांच्या येण्या-जाण्याच्या कालावधीत निम्माने घट झाल्याने देशांतर्गत उत्पादने पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकली आहेत. यामुळे, भारताची उत्पादने पूर्वीपेक्षा वेगवान गतीने जागतिक बाजारात पोहोचू शकत आहेत.
नील अर्थव्यवस्थेविषयी बोलताना, पंतप्रधानांनी देशाच्या सागरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनात मच्छिमारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. त्यांनी सविस्तर माहिती देताना, मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण, जहाज नांगरणी केंद्रांचा विकास आणि शीत साखळी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पीएम मत्स्य संपदा योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून तामिळनाडूसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. “माशांचा ताजेपणा टिकवण्यासाठी वाहतूक वाहने खरेदीलाही मदत देऊ कऱण्यात आली आहे, ” असे मोदी यांनी सांगितले.
किनारपट्टीवरील समुदायांना देण्यात आलेल्या लक्षित समर्थनाबद्दल सविस्तर सांगताना, पंतप्रधानांनी चेन्नई फिशिंग हार्बरचे आधुनिकीकरण आणि राज्यात सी-वीड पार्कचा अर्थात समुद्री शेवाळ उद्यानाचा विकास यांसारख्या अनेक प्रमुख उपाययोजनांची यादी सादर केली. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आता मच्छिमारांना खेळते भांडवलही सहज उपलब्ध झाले आहे, असे मोदींनी सांगितले.
या लक्षित सागरी धोरणांच्या ठोस परिणामांचा उत्सव साजरा करताना पंतप्रधानांनी अभिमानाने जाहीर केले की राष्ट्रीय मत्स्य उत्पादनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षी सागरी खाद्यपदार्थांची निर्यात प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. यामुळे आपल्या मच्छिमार कुटुंबांचे आणि किनारपट्टीवरील समुदायांमधील लोकांचे जीवनमानही सुधारत आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
भविष्यासाठीच्या एकात्मिक दृष्टिकोनाने आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी तामिळनाडूला समृद्धीच्या सतत नवनवीन उंचीवर पोहोचण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्ण आणि अविचल वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी सर्वप्रथम पूर्णपणे विकसित तामिळनाडू सुनिश्चित करून, एका विकसित राष्ट्राचे भव्य स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले आणि नव्याने सुरू झालेल्या सर्व प्रकल्पांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. एकत्र येऊन आपण विकसित तामिळनाडूच्या माध्यमातून विकसित भारताचा संकल्प साकार करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
Works over Rs. 13,000 crore being launched in Chennai! https://t.co/76Uo9a3UaS
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2026
It is a pleasure to be in Chennai with all of you.
This is a historic day for Tamil Nadu.
Today’s programme involves projects worth thirteen thousand crore rupees.
We are inaugurating many completed projects and laying foundations for new ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
भारत अपनी सांस्कृतिक शक्ति से प्रेरणा लेता है, विज्ञान की प्रगति से आगे बढ़ता है और आधुनिक infrastructure के जरिए नए अवसरों का निर्माण कर रहा है।
हमारी विरासत और भविष्य की हमारी आकांक्षाएं साथ-साथ आगे बढ़ रही हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आधुनिक शहरों में हमें holistic infrastructure की जरूरत होती है।
और इसलिए बीते एक दशक में, हमने पूरे देश में metro network का बहुत बड़ा expansion किया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आज देश में port infrastructure को भी मजबूत बनाया जा रहा है, ताकि shipping sector नई ऊंचाइयों तक पहुंच सके: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
***
शैलेश पाटील/माधुरी पांगे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Works over Rs. 13,000 crore being launched in Chennai! https://t.co/76Uo9a3UaS
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2026
It is a pleasure to be in Chennai with all of you. This is a historic day for Tamil Nadu. Today’s programme involves projects worth thirteen thousand crore rupees. We are inaugurating many completed projects and laying foundations for new ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
भारत अपनी सांस्कृतिक शक्ति से प्रेरणा लेता है, विज्ञान की प्रगति से आगे बढ़ता है और आधुनिक infrastructure के जरिए नए अवसरों का निर्माण कर रहा है। हमारी विरासत और भविष्य की हमारी आकांक्षाएं साथ-साथ आगे बढ़ रही हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आधुनिक शहरों में हमें holistic infrastructure की जरूरत होती है। और इसलिए बीते एक दशक में, हमने पूरे देश में metro network का बहुत बड़ा expansion किया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026
आज देश में port infrastructure को भी मजबूत बनाया जा रहा है, ताकि shipping sector नई ऊंचाइयों तक पहुंच सके: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2026