Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

20 वर्षांखालच्या 22 व्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 19 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय संघाचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 1 जून 2026

 

20 वर्षांखालच्या 22 व्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेत 10 सुवर्णपदकांसह एकूण 19 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

या यशातून भारताच्या युवा खेळाडूंच्या दृढनिश्चयाची आणि त्यांची उत्कृष्टतेची प्रचिती येते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हे यश आगामी काळात देशाच्या असंख्य युवांना क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडण्यासाठी प्रेरणा देईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

20 वर्षांखालच्या 22 व्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 10 सुवर्णपदकांसह एकूण 19 पदके जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. या उत्कृष्ट कामगिरीतून भारताच्या युवा खेळाडूंच्या दृढनिश्चयाची आणि त्यांची उत्कृष्टतेची प्रचिती येते. हे यश आगामी काळात देशाच्या असंख्य युवांना क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडण्यासाठी प्रेरित करो.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai