पीएम्इंडिया
चार दशकांहून अधिक काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरीमुळे हे यश मिळाले असून, संघाचा निर्धार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, या यशामुळे देशभरात हॉकीच्या लोकप्रियतेला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“भारतीय हॉकीसाठी अत्यंत विशेष क्षण! आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल चार दशकांहून अधिक काळानंतर मानाचे सुवर्णपदक मायदेशी आणणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या यशाचा देशभरातील नागरिक आनंद साजरा करत आहेत. हे यश उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरीचे फलित आहे. संघाचा निर्धारही अत्यंत प्रेरणादायी आहे. संघाच्या आगामी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.या यशामुळे देशभरात हॉकीच्या लोकप्रियतेला आणखी चालना मिळो: पंतप्रधान @narendramodi”
A very special moment for Indian Hockey!
The people of India are rejoicing in the success of the Women’s Hockey Team, who bring home the coveted Gold at the Asian Games and that too after over 4 decades. This is the result of outstanding skills and teamwork. Their determination is very inspiring as well. My best wishes to the team for their upcoming endeavours.
May this success contribute to Hockey’s popularity across the nation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2026
***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]