Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंजाबमधील फिरोजपूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा


पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी,  अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून 2 लाख रुपये, तसेच, अपघातातील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.
‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
“पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी,  हीच प्रार्थना. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना ‘PMNRF’ मधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: PM@narendramodi”

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai