Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्रांचा ‘मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मेजर अभिलाषा बराक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


 

मेजर अभिलाषा बराक यांना ‘यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. मेजर बराक या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलात (UNIFIL) एंगेजमेंट टीम कमांडर आणि जेंडर फोकल पॉइंट म्हणून कार्यरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट सेवेची आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाची पोचपावती आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

बराक यांची ही कामगिरी देशाची आणि मानवतेची सेवा करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या असंख्य तरुण भारतीयांसाठी, विशेषतः देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमातील संदेशात म्हटले आहे:

“मेजर अभिलाषा बराक यांना ‘यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मेजर बराक या लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र अंतरिम दलात (UNIFIL) एंगेजमेंट टीम कमांडर आणि जेंडर फोकल पॉइंट म्हणून कार्यरत आहेत. हा सन्मान म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट सेवेची आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाची पोचपावती आहे. त्यांची कामगिरी राष्ट्र आणि मानवतेची सेवा करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या असंख्य तरुण भारतीयांसाठी, विशेषतः देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.”

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai