पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 10 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपुलकीने दिलेल्या शुभेच्छा तसेच त्यांनी काढलेल्या कौतुकोद्गारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे आभार व्यक्त केले. मागील काही वर्षांत जे काही यश साध्य झाले आहे, ते भारतीय जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि त्यांच्या आकांक्षांचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
140 कोटी भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा असल्याचे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी ‘पीएम-जनमन’ आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ यांचा उल्लेख केल्याबद्दल आपल्याला विशेष समाधान वाटत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ‘अंत्योदय’च्या खऱ्या भावनेनुसार विकासाचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘एक्स’ समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात :
“राष्ट्रपती जी,
आपण दिलेल्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेल्या कौतुकोद्गारांबद्दल मी आपला आभारी आहे. गेल्या काही वर्षांत जे यश साध्य झाले आहे, ते भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न आणि त्यांच्या आकांक्षांचे फलित आहे. 140 कोटी भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा आहे. आपण ‘पीएम-जनमन’ आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना’चा उल्लेख केला, याचा मला विशेष आनंद आहे. ‘अंत्योदया’च्या खऱ्या भावनेनुसार विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”
@rashtrapatibhvn”
Rashtrapati Ji,
I am grateful to you for your warm wishes and kind words. Whatever has been achieved over the years is the result of the collective efforts and aspirations of the people of India. The affection and blessings of 140 crore Indians are my greatest strength and… https://t.co/QnElTdx03o
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2026
* * *
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai