Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘विकसित भारत’च्या दिशेने होणारा प्रवास हा एक सामूहिक संकल्प असल्याचे अधोरेखित करणारा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाचा भविष्यावरील विश्वास दृढ केला असून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे, असे या लेखात म्हटले आहे. ‘विकसित भारत’च्या दिशेने होणारा प्रवास हा आशा, उद्देश आणि सहभागावर आधारित एक सामूहिक संकल्प असल्याचेही या लेखात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

 “दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती @gupta_rekha लिहितात की, पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्वाने देशाचा भविष्यावरील विश्वास दृढ केला आहे आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांनी ‘विकसित भारत’च्या दिशेने होणारा प्रवास हा आशा, उद्देश आणि सहभागावर आधारित एक सामूहिक संकल्प असल्याचे वर्णन केले आहे.”

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai