Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट

जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट


नवी दिल्‍ली, 17 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्स मधील एवियान शहरात सुरु असलेल्या जी-7 परिषदेच्या निमित्ताने, आज ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.

गेल्या वर्षी दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांचे दौरे केल्या नंतर भारत आणि ब्रिटन मधील वृद्धिंगत झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला, तसंच,  व्यापार आणि आर्थिक विकास, संरक्षण आणि  सुरक्षा, हवामान बदल आणि हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, शिक्षण आणि परस्पर संबंध  यांसह ‘व्हिजन 2035’ च्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये झालेल्या  प्रगतीचे स्वागत केले. सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापारी कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केली. दोन्ही देशांमध्ये असलेल्या मजबूत शैक्षणिक भागीदारीबाबत उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले तसेच लिव्हरपूल विद्यापीठाने बंगळूरू इथे तसंच यॉर्क आणि ब्रिस्टल विद्यापीठांनी मुंबईत, आपली विद्यापीठक्षेत्रं उभारणीसाठी नुकत्याच  झालेल्या घडामोडींची त्यांनी नोंद घेतली.

या वर्षाच्या सुरुवातीला, दिल्लीत झालेल्या  ‘ए आय इम्पॅक्ट समीट’ मध्ये ब्रिटनच्या  प्रभावी सहभागाबद्दल केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांचे आभार मानले, तसंच, तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाअंतर्गत, सातत्याने होत असलेल्या प्रगतीचे स्वागत केले, यात अलीकडेच सुरु करण्यात आलेल्या ‘भारत-ब्रिटन यांच्यातील खनिजांच्या जागतिक पुरवठा साखळी ऑब्झर्व्हेटरीचा समावेश आहे.

या भेटीत, उभय नेत्यांनी, पश्चिम आशिया आणि युक्रेनसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय केला. भारत आणि ब्रिटन मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याबाबतच्या परस्पर कटीबद्धतेचा पुनरुच्चारही दोन्ही नेत्यांनी केला.

 

* * *

नाना मेश्राम/सविता म्‍हस्कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai