Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘पश्चिमबंगा’ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा; डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण


नवी दिल्‍ली, 19 जून 2026

 

पश्चिमबंगा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

हा दिवस साहित्य, संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, व्यापार आणि वाणिज्य, सामाजिक सुधारणा तसेच इतर विविध क्षेत्रांतील योगदानाद्वारे भारताच्या इतिहासाला सखोल आकार देणाऱ्या राज्याचा गौरव करणारा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी नमूद केले की, पश्चिम बंगालने असंख्य प्रकारे भारताच्या राष्ट्रीय जाणीवेला समृद्ध केले आहे.

मोदी यांनी सांगितले की, 20 जून हा दिवस पश्चिम बंगालच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा असून, याच दिवशी पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग राहील, याची खात्री झाली होती. या संदर्भात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका अमूल्य असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच, 2026 हे वर्ष डॉ. मुखर्जी यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की, जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारसोबत मिळून कार्य करेल. मोदी यांनी पश्चिम बंगालच्या प्रगतीसाठी आणि तेथील जनतेच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

 पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे :

“पश्चिमबंगा’ दिनानिमित्त पश्चिम बंगालमधील माझ्या भगिनी आणि बंधूंना हार्दिक शुभेच्छा.

हा दिवस साहित्य, संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, व्यापार आणि वाणिज्य, सामाजिक सुधारणा तसेच इतर विविध क्षेत्रांतील योगदानाद्वारे भारताच्या इतिहासाला सखोल आकार देणाऱ्या राज्याचा गौरव करणारा आहे. पश्चिम बंगालने वेळोवेळी असंख्य प्रकारे भारताच्या राष्ट्रीय जाणीवेला समृद्ध केले आहे.

आज, 20 जून हा दिवस पश्चिम बंगालच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग राहील, याची खात्री झाली होती. यामध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भूमिका अमूल्य होती. तसेच, यावर्षी 2026 मध्ये आपण डॉ. मुखर्जी यांची 125 वी जयंती साजरी करत आहोत.

जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारसोबत मिळून कार्य करेल. पश्चिम बंगालच्या प्रगतीसाठी आणि तेथील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.”

 

* * *

आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai