Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल केले कौतुक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील  पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला आज भेट दिली.

पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौशल्य विकास क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यांच्या गावाच्या विकासाला  गती दिली आहे, असे  पंतप्रधानांनी नमूद केले.

तरुणांना अशी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असल्यामुळे आत्मनिर्भरतेचे नवीन मार्ग खुले होत आहेत, हे पाहून आनंद झाला, असे ते म्हणाले.

समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला भेट दिली. राष्ट्रपतीजींनी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून आपल्या गावाच्या विकासाला  गती दिली आहे, हे उल्लेखनीय आहे.

आपल्या तरुणांना अशी कौशल्ये मिळत आहेत, त्यामुळे संधी आणि आत्मनिर्भरतेचे नवीन मार्ग खुले होत आहेत, हे पाहून आनंद होतो.

@rashtrapatibhvn”

***

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]