Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंबीयांच्या पहाडपूर येथील समाधीस्थळावर पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंबीयांच्या पहाडपूर येथील समाधीस्थळावर पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर येथील शाळेच्या परिसरात असलेल्या दिवंगत श्याम चरण मुर्मू, लखन मुर्मू आणि सिपुन मुर्मू यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.

वैयक्तिक दुःखद प्रसंगांना सामोरे जात असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दाखवलेले धैर्य आणि निर्धार  प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रपतींच्या वैयक्तिक अनुभवांमुळे सार्वजनिक सेवेप्रती आणि लोकांचे जीवनमान उंचावण्याप्रति  त्यांची बांधिलकी अधिक दृढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी ‘X’ वर लिहिले:

“पहाडपूर येथील शाळेच्या परिसरातल्या दिवंगत श्याम चरण मुर्मू, लखन मुर्मू आणि सिपुन मुर्मू यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.

वैयक्तिक दुःखद प्रसंगांनंतरही राष्ट्रपतींनी दाखवलेले धैर्य आणि निर्धार  प्रेरणादायी आहे. त्यांच्या वैयक्तिक अनुभवांमुळे सार्वजनिक सेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी अधिक दृढ झाली आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे.”

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]