Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक या तीन जहाजांच्या जलावतरण समारंभात केलेल्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक या तीन जहाजांच्या जलावतरण समारंभात केलेल्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक


नवी दिल्‍ली, 21 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक या तीन जहाजांच्या जलावतरण समारंभात केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

‘एक्स’ वरील पोस्ट्स मध्ये त्यांनी लिहिले आहे:

“ज्या देशाचे सागरी सामर्थ्य भक्कम असते, त्याचा आर्थिक आणि सामरिक प्रभावही तितकाच प्रबळ असतो; भारत त्यासाठी स्वतःला सज्ज करत आहे”

“भारताच्या सामर्थ्याची ओळख आत्मनिर्भरतेमध्ये आहे आणि ज्या दिवशी आपण निर्माते बनू, त्याच दिवशी आपण निर्णय घेणारेही बनू.”

“भारत आज आपली संपूर्ण सागरी परिसंस्था बळकट करत आहे. यामुळे व्यापाराचा खर्च कमी झाला आहे, उद्योगांना नवी चालना मिळाली आहे आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत.”

“वर्ष 2014 नंतर आम्ही धोरणात्मक स्तरावर मोठ्या सुधारणा केल्या आहेत. यामुळे संरक्षण क्षेत्राच्या उत्पादनात वेगाने वाढ झाली असून आपली संरक्षण क्षेत्रातील निर्यात देखील अभूतपूर्व गतीने वृद्धिंगत होत आहे.”

* * *

नितीन फुल्‍लुके/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai