Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले अधोरेखित

पंतप्रधानांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे केले अधोरेखित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर संमेलन 2026 मध्ये केलेल्या त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत.

‘एक्स’ वर सामायिक केलेल्या संदेशांच्या शृंखलेत मोदी लिहितात;

“ज्या नक्षलग्रस्त भागात जायला लोक दिवसा देखील घाबरत असत, तिथे आम्ही राष्ट्र प्रथम भावनेसह विकासाचा निश्चय करून आगेकूच करत आहोत. परिणामी, आज देशात माओवादी दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे.

#RepublicSummit2026”

“सेवाभावाच्या गेल्या 12 वर्षांच्या कालावधीने आम्हाला आणखी एक यश मिळवून दिले आहे – निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आशा-आकांक्षांनी भरलेल्या भारताची उभारणी!

#RepublicSummit2026”

“मध्यमवर्गाला आम्ही नेहमीच खूप प्राधान्य दिले आहे. या वर्गाचे जीवनमान सुलभ होण्यासाठी सरकारने प्रत्येक पातळीवर काम केले आहे.

#RepublicSummit2026”

“म्हणूनच भारताच्या विकासाच्या या महत्त्वाच्या काळात वरकरणी पटतील असे पण खरेतर फोल असलेले युक्तिवाद करणाऱ्यांपासून सावध राहणे खूप गरजेचे आहे…

#RepublicSummit2026”

***

NitinFulluke / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai