Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारच्या अमीरांसोबत दूरध्वनीवरून संभाषण


नवी दिल्‍ली, 23 जून 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज कतार राष्ट्राचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.

21 जून रोजी कतारमधील रास लाफान या औद्योगिक शहरात झालेल्या अपघातात, प्राण गमावलेल्या भारतीय नागरिकांबद्दल, कतारच्या अमीरांच्या मंत्रालयाने शोक व्यक्त केला आणि जखमी झालेल्यांच्या आरोग्यात शीघ्रगतीने सुधारणा व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

बाधित कुटुंबांप्रति सहानुभूती दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना धन्यवाद दिले आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशांतील नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि एकमेकांना आपला पाठिंबा आहे असे सांगत  एकजुटीचा पुनरुच्चार केला.

पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा करताना, पंतप्रधानांनी शांतता प्रस्थापित करण्याच्या कतारच्या सकारात्मक प्रयत्नांमधील योगदानाबद्दल संतोष व्यक्त केला आणि त्यामुळे या प्रदेशात चिरस्थायी शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली.

उभय देशातील नेत्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांच्यात सहमत झाले.

 

* * *

नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai