Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पारंपरिक भारतीय हस्तकला आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकते, हे सांगणारा लेख पंतप्रधानांकडून सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.  पांरपरिक भारतीय हस्तकला आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकते, हे या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ हा उपक्रम स्थानिक हस्तकारागीरांना बाजारपेठेत प्रवेश करण्यास, शाश्वत उपजीविका निर्मिती, वारसा जतन करण्यास आणि भारताची जागतिक स्पर्धात्मकता बळकट करण्यास मदत करत आहे.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमांवरून लिहिलेल्या संदेशामध्ये नमूद केले आहे,

पारंपरिक भारतीय हस्तकारागीर कशाप्रकारे नवोन्मेष आणि जागतिक भागीदारीच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात, हे केंद्रीय मंत्री @nsitharaman निर्मला सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे.

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ हा उपक्रम स्थानिक हस्तकलांना बाजारपेठ प्रवेश करण्यास शाश्वत उपजीविका निर्मिती, वारसा जतन करण्यास आणि भारताची जागतिक स्पर्धात्मकता बळकट करण्यास मदत करत आहे.

***

माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai