Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी निसर्ग रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित शेअर केले


निसर्गाचे रक्षण आणि आदर यामध्येच मानवतेचे कल्याण सामावले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारताच्या कालातीत परंपराही आपल्याला जीवन जगण्याचा हाच योग्य मार्ग स्वीकारायला आणि निसर्गाशी सुसंवाद राखून जगायला प्रेरित करतात, असे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी संस्कृत शुभाषित शेअर केले आहे.

“लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा। ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः॥

दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा। श्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः॥”

निसर्ग आणि नीतिमत्ता याच्याशी सुसंगत असे जीवन जगणे हाच सुख, सुरक्षा आणि कल्याणाचा पाया आहे, असा संदेश हे सुभाषित देते. म्हणून, दिशांच्या रक्षक, इंद्राच्या नेतृत्वाखालील सर्व देवता, सहा ऋतू, सर्व महिने, वर्षे, रात्री, दिवस आणि शुभ क्षण आपल्यासाठी नेहमीच आशीर्वाद आणि समृद्धी घेऊन येवोत. वेद, पवित्र परंपरा आणि धर्म सर्वांचे सर्वतोपरी, सर्वदा रक्षण करोत.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

“निसर्गाचे जतन आणि आदर यातच मानवतेचे कल्याण आहे. आपली परंपरा देखील आपल्याला या सत्कर्माचे पालन करण्याची प्रेरणा देते.

लोकपालाश्च ते सर्वे वासवप्रमुखास्तथा। ऋतवः षट् च ते सर्वे मासाः संवत्सराः क्षपाः॥

दिनानि च मुहूर्ताश्च स्वस्ति कुर्वन्तु ते सदा। श्रुतिः स्मृतिश्च धर्मश्च पातु त्वां पुत्र सर्वतः॥”

***

NehaKulkarni / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai