Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांसाठीच्या गोळाफेक F57 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

ग्लासगो इथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांसाठीच्या गोळाफेक F57 या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

या हंगामामधील त्यांची ही सर्वोत्तम फेक म्हणजे उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा अ‍ॅथलेटिक्स मधील सुवर्णपदकांची  दोन दशकांची दीर्घ प्रतिक्षा संपुष्टात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मोदी यांनी यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे की 

“ग्लासगोमध्ये इतिहास घडला आहे.

शर्मिला यांना महिला गोळाफेक f57 क्रीडा प्रकारात मिळालेले सुवर्णपदक फार खास आहे आणि या हंगामातील त्यांची ही सर्वोत्तम फेक होती. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा अ‍ॅथलेटिक्स मधील सुवर्णपदकासाठीची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आली  

पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा 

#CWG2026”

 

* * *

निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai