पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो इथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनामध्ये पुरुषांच्या +110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल लवप्रीत सिंगचे अभिनंदन केले आहे.
लवप्रीत सिंगने ‘स्नॅच’ प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
मोदी यांनी त्याच्या समर्पण आणि जिद्दीचे कौतुक केले, तसेच त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर लिहिले;
“पुरुषांच्या +110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकणाऱ्या लवप्रीत सिंगची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट आहे. स्नॅचमधल्या त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक नवा विक्रमही प्रस्थापित झाला आहे. त्याची जिद्द आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. #CWG2026”
Exceptional performance by Lovepreet Singh for winning a Silver in the Men’s +110kg event. His outstanding effort in the snatch set a new Commonwealth Games record too. His dedication and determination are truly admirable. My best wishes to him for the endeavours ahead.#CWG2026 pic.twitter.com/fwgvJ5G3Vv
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2026
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Exceptional performance by Lovepreet Singh for winning a Silver in the Men's +110kg event. His outstanding effort in the snatch set a new Commonwealth Games record too. His dedication and determination are truly admirable. My best wishes to him for the endeavours ahead.#CWG2026 pic.twitter.com/fwgvJ5G3Vv
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2026