Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह यांचे अभिनंदन केले आहे.

यश वीर सिंह यांची प्रभावी फेक त्यांचा उत्साह आणि समर्पणाचे दर्शन घडवणारी होती, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले आहे:

“पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

#CWG2026”

पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #CWG2026 pic.twitter.com/nMq59WERgs

— नरेंद्र मोदी (@narendramodi) August 1, 2026 

***

यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]