Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हर्ष सिंह यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले


 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्ष सिंह यांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय ज्युडोसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून, हर्ष सिंह यांचा ध्यास आणि समर्पण त्यांच्या असामान्य कामगिरीतून स्पष्टपणे प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

“भारतीय ज्युडोसाठी ऐतिहासिक दिवस!

सुवर्णपदक जिंकल्याबद्दल हर्ष सिंह याचे अभिनंदन. या असामान्य कामगिरीतून त्याचा ध्यास आणि समर्पण स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.ॉ

#CWG2026”

***

यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai