Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या 90+ किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नरेंद्र बेरवाल यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


 

ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मुष्टियुद्धात पुरुषांच्या 90 किलोहून अधिक वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र बेरवाल यांचे अभिनंदन केले आहे. 

संपूर्ण स्पर्धेत अथांग धैर्य आणि दृढनिश्चय दाखवल्याबद्दल त्यांनी नरेंद्र बेरवाल यांचे कौतुक केले. 

मोदी यांनी त्यांना आगामी वर्षांत अशाच अनेक यशासाठी शुभेच्छा दिल्या.

‘X’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान लिहितात,

“राष्ट्रकुल खेळात नरेंद्र बेरवाल यांनी मुष्टियुद्ध स्पर्धेत पुरुषांच्या 90 किलोहून अधिक वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याचा अत्यंत आनंद आहे. संपूर्ण स्पर्धेत अथांग धैर्य आणि दृढनिश्चय दाखवल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. भविष्यात त्यांना असेच अनेक यश लाभो, हीच सदिच्छा. 

#CWG2026″

***

यश राणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai