पीएम्इंडिया
नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियानच्या शुभारंभप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या आपल्या भाषणातील क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.
एक्सवरील संदेशांच्या एका मालिकेत पंतप्रधान म्हणाले की,
काशीच्या पवित्र भूमीतून उदयास आलेला हा कल्याणकारी विचार आता राष्ट्रीय प्रकल्प बनला आहे. नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान सामूहिक ताकदीच्या बळावर प्रत्येक युवा मनापर्यंत पोहोचेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
काशी की पावन धरती से उठा कल्याणकारी विचार अब एक नेशनल प्रोजेक्ट बन गया है। मुझे पूरा विश्वास है कि ‘नशा मुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियान’ सामूहिकता की ताकत से हर युवा मन को छूने वाला है। pic.twitter.com/Z4CGfOPxHN
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
अमली पदार्थ क्षणिक आनंदाची अनुभूती देतात; मात्र ते कारकीर्द आणि कौटुंबिक जीवनाला अधोगतीच्या दिशेने नेतात. त्यामुळे आपल्या युवकांनी नशामुक्त राहून आपल्या क्षमता जपल्या पाहिजेत.
ड्रग्स कुछ समय के लिए ‘High’ देता है, लेकिन करियर और फैमिली लाइफ को ‘Low’ कर देता है। इसलिए नशा मुक्त रहकर हमारे युवाओं को अपने Potential को Protect करना है! pic.twitter.com/Pne82x4qyK
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
नशा मुक्तीच्या दिशेने देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांतील आपल्या प्राध्यापकांना माझे हे विशेष आवाहन आहे.
नशा मुक्ति की दिशा में देशभर के कॉलेजों और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर्स से मेरा यह विशेष आह्वान… pic.twitter.com/uikh4d1qDq
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai