Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या वाढत्या आत्मनिर्भर वैद्यकीय तंत्रज्ञान परिसंस्थेवरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. या लेखात भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या आत्मनिर्भर वैद्यकीय तंत्रज्ञान (Med-Tech) परिसंस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. ही आत्मनिर्भरता देशांतर्गत उत्पादन, आयतीवरील कमी झालेले अवलंबित्व, तसेच पीएलआय (PLI) योजना आणि मेडिकल डिव्हाइस पार्क्ससारख्या उपक्रमांमुळे साध्य होत आहे, असे मोदी यांनी नमूद केले. यामुळे भारत परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करणारा एक विश्वासार्ह जागतिक मेड-टेक भागीदार बनत असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘X’ वर पोस्ट केले:

“केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी देशांतर्गत उत्पादन, आयतीवरील घटलेले अवलंबित्व आणि पीएलआय व मेडिकल डिव्हाइस पार्क्ससारख्या योजनांच्या जोरावर भारताच्या विस्तारणाऱ्या आत्मनिर्भर मेड-टेक परिसंस्थेवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात की, सर्वांना परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवा प्रदान करण्यावर भर देत भारत एक विश्वासार्ह जागतिक मेड-टेक भागीदार म्हणून वेगाने पुढे येत आहे.”

https://hindustantimes.com/opinion/indias-march-towards-self-reliance-in-medtech-101786121787652.html

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai