Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून, त्याद्वारे दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृती यांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले आहे


नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृतीद्वारे मने जिंकण्याचे सामर्थ्य अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले.

‘एक्स’ (X) या समाजमाध्यमावर केलेल्या संदेशांत पंतप्रधान म्हणतात :

“आपले युवा साथीदार केवळ देशाचे भविष्यच नाहीत, तर देशाची सर्वात मोठी ताकत देखील आहेत. त्यांनी आपली संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामर्थ्याने जगभरात स्वतःला सिद्ध केले आहे.”

चक्षुषा मनसा वाचा कर्मणा च चतुर्विधम्।

प्रसादयति यो लोकं तं लोकोऽनुप्रसीदति।।”

जी व्यक्ती आपल्या दूरदृष्टी, विचार, शब्द आणि कृतींद्वारे लोकांची मने जिंकते, त्याबदल्यात त्याला लोकांचा विश्वास, आदर आणि प्रतिष्ठा मिळवते. 

 

* * *

नेहा कुलकर्णी/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai