Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून 9/11 हल्ल्यातील बळींचे स्मरण; दहशतवादाचा सामना करण्याचा दृढ संकल्प पुन्हा व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9/11 च्या भीषण हल्ल्यांच्या 25 व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त त्यातील बळींचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ज्यांची आयुष्ये कायमची बदलली, त्या पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली.

मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे जगभरात असंख्य बळी गेले आहेत. सीमापार दहशतवादाचा बळी ठरलेला देश म्हणून, भारत अनेक दशकांपासून दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहिला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, दहशतवादाचे स्वरूप आणि धोके बदलत असले तरी, दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आणि रूपांना विरोध करण्याचा भारताचा संकल्प अटळ आहे. या संकटाचा सामना करण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधानांनी 2014 मधील 9/11 मेमोरियल अँड म्युझियम’च्या भेटीदरम्यानचे काही क्षणही यावेळी सामायिक केले.

एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की,

9/11 च्या भीषण हल्ल्यांना 25 वर्षे पूर्ण होत असताना, आम्ही त्यातील बळींचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्यांची आयुष्ये कायमची बदलली, त्या पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

दहशतवादामुळे जगभरात असंख्य बळी गेले आहेत. सीमापार दहशतवादाचा बळी ठरलेला देश म्हणून, भारत अनेक दशकांपासून या लढ्यात आघाडीवर राहिला आहे.

दहशतवादाचे धोके बदलत असले तरी, दहशतवादाच्या सर्व प्रकारांना आणि रूपांना विरोध करण्याचा आमचा संकल्प अटळ आहे. या संकटाचा सामना करण्याच्या सर्व प्रयत्नांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

येथे 2014 मधील 9/11 मेमोरियल अँड म्युझियम’च्या माझ्या भेटीचे काही क्षण दिले आहेत.

***

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai