पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले, हा विजय भारतीय क्रिकेटचा एक शानदार विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे की;
हा सामना अतिशय दमदार झाला. यामध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि उत्कृष्ट संघभावनेचे दर्शन झाले. या विजयामुळे भारताला या क्रीडास्पर्धांमध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. संघाच्या या कामगिरीमुळे देशाला त्यांचा अभिमान वाटत असून त्यांचा खेळ देशभरातील अगणित युवा क्रिकेट खेळाडूंना प्रेरणा देईल असे सांगून पंतप्रधानांनी या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
“भारतीय क्रिकेटसाठी एक शानदार विजय!
आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. स्पर्धेतील ही अतिशय दमदार कामगिरी होती, जी आत्मविश्वास, कौशल्य आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरीने ओतप्रोत होती.
या ऐतिहासिक विजयामुळे भारताला या क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळाले. संघाच्या या कामगिरीमुळे देशाला त्यांचा अभिमान वाटत असून त्यांचा खेळ देशभरातील अगणित युवा क्रिकेट खेळाडूंना प्रेरणा देईल
संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा: PM @narendramodi”
A splendid triumph for Indian cricket!
Heartiest congratulations to our Women’s Cricket Team on winning the Gold medal at the Asian Games. It was a commanding performance at the Games, marked by confidence, skill and wonderful teamwork.
This victory also brings India its first Gold of this edition of the Games. The team has made the nation proud and will inspire countless young cricketers across the country.
Best wishes to the entire squad: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 22, 2026
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
A splendid triumph for Indian cricket!
— PMO India (@PMOIndia) September 22, 2026
Heartiest congratulations to our Women’s Cricket Team on winning the Gold medal at the Asian Games. It was a commanding performance at the Games, marked by confidence, skill and wonderful teamwork.
This victory also brings India its first… pic.twitter.com/oZI9Uoyp6I