Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिन केला साजरा


नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त महाकाय एकशिंगी गेंड्यांच्या अस्तित्वाबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्याच्या संरक्षणासाठी आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या सर्वांची प्रशंसा केली.आसाममध्ये आता जगातील जवळपास 80 टक्के गेंड्यांची संख्या आढळते आणि गेंड्यांची अवैध शिकार रोखण्यासाठी काझीरंगाने केलेल्या प्रयत्नांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल आणि बिहार मधील गेंडे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परतले आहेत आणि त्यांना उच्च दर्जाचे संरक्षण दिले जात आहे तर उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यानातील गेंडा पुनर्वसन  कार्यक्रम यशस्वीरित्या इतिहास घडवत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा उपक्रम वन्यजीव आढळणाऱ्या राज्यांमध्ये  प्राण्यांचे संरक्षण आणि सक्रिय वन्यजीव व्यवस्थापनाप्रती लोकांची सातत्यपूर्ण वचनबद्धता दर्शवतो. याशिवाय देशातील या प्रजातीचे संवर्धन कार्य अधिक पुढे नेण्यासाठी वन्यजीव आढळणाऱ्या राज्यांमध्ये गेंड्यांचे संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, जनुकीय सुधारणा आणि त्यांच्या संख्येतील बदलांचा अभ्यास समजून घेण्यासाठी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट ऱ्हायनो सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.

एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

जागतिक गेंडा दिनानिमित्त, आपण भव्य एकशिंगी गेंड्याच्या अस्तित्वाबद्दल समाधान व्यक्त करतो  आणि त्याच्या संरक्षणासाठी आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या सर्वांची प्रशंसा  करतो.

आसाममध्ये आता जगातील जवळपास 80 टक्के गेंड्यांची संख्या आढळते आणि गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी काझीरंगाने केलेल्या प्रयत्नांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

एकीकडे बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये गेंडे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परतले आहेत आणि त्यांना उच्च दर्जाचे संरक्षण दिले जात आहे. तर दुसरीकडे दुधवा राष्ट्रीय उद्यानातील गेंडा पुनर्वसन  कार्यक्रम यशस्वीरित्या इतिहास घडवत आहे. हा उपक्रम वन्यजीव आढळणाऱ्या राज्यांमध्ये  प्राण्यांचे संरक्षण आणि सक्रिय वन्यजीव व्यवस्थापनाप्रती लोकांची अतूट वचनबद्धता दर्शवतो.

देशातील प्रजाती संवर्धनाला पुढे नेताना, मला हे सांगताना आनंद होत आहे की गेंड्यांच्या संरक्षणासाठी ‘प्रोजेक्ट ऱ्हायनो’ सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत गेंड्यांचे संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, जनुकीय सुधारणा आणि त्यांच्या संख्येतील बदलांचा अभ्यास यासाठी संबंधित राज्यांना आर्थिक आणि  तांत्रिक मदत दिली जाणार आहे.

 
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai