Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत या क्रीडा प्रकारात भारताचा पहिला आशियाई क्रीडा पदक विजेता ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय मीनाचे केले अभिनंदन


नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत या क्रीडा प्रकारात भारताचा पहिला आशियाई क्रीडा पदक विजेता ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय मीनाचे अभिनंदन केले. जयचे हे यश भारतीय सॉफ्ट टेनिससाठी एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

जय मीना याची कामगिरी भारतातील सॉफ्ट टेनिसच्या वाटचालीतील एक संस्मरणीय नवा अध्याय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या पदकामुळे अनेक युवकांना सॉफ्ट टेनिस खेळण्यासाठी आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, पुढील वाटचालीसाठी त्यांनी जयला शुभेच्छा दिल्या.

X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“भारतीय सॉफ्ट टेनिससाठी ऐतिहासिक कामगिरी!

पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये भारताचे पहिले पदकविजेते ठरल्याबद्दल जय मीनाचे अभिनंदन. त्याची कामगिरी भारतातील सॉफ्ट टेनिसच्या वाटचालीतील एक संस्मरणीय नवा अध्याय आहे.

या पदकामुळे अनेक युवकांना सॉफ्ट टेनिस खेळण्यासाठी आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रेरणा मिळो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” — पंतप्रधान @narendramodi”

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai