Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयुष्मान भारतच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी अधोरेखित केले त्याचे यश


नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत या उपक्रमाला आठ वर्षे पूर्ण झाल्याचे यश अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी या कल्पनेने आठ वर्षांपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, आज 60 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना रु. 5 लाख वार्षिक आरोग्य कवच, ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय खर्चात विक्रमी बचत झाली आहे, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना फायदा झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.

आयुष्मान आरोग्य मंदिरांनी आधीच 500 कोटींहून अधिक केसेस किंवा भेटी नोंदवल्या आहेत, ज्यामुळे तळागाळातील प्राथमिक आरोग्य सेवा बळकट होत आहे, असे निरीक्षण व्यक्त करून पंतप्रधानांनी आरोग्य सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे. हे स्पष्ट केले. त्यांनी आयुष्मान भारतच्या सर्व लाभार्थ्यांनाही शुभेच्छा दिल्या.

“पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यावर सामायिक केलेल्या एका पोस्ट मध्ये लिहिले आहे की,

आठ वर्षांपूर्वी, प्रत्येक भारतीयाला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळावी या कल्पनेने आयुष्मान भारत सुरू करण्यात आला होता.

आज 60 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना रु. 5 लाख वार्षिक आरोग्य कवच, ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आहे.

त्याचप्रमाणे यामुळे वैद्यकीय खर्चात विक्रमी बचत झाली आहे, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना फायदा झाला आहे. 

आणि आरोग्यसेवा आता प्रत्येक घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांनी याआधीच 500 कोटींहून अधिक भेटी नोंदवल्या आहेत, ज्यामुळे तळागाळात प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत होत आहे.

आयुष्मान भारतच्या सर्व लाभार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

#8YearsOfAyushmanBharat”

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai