पीएम्इंडिया
नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमधील उडुपी येथील श्री पेजावर अधोक्षज मठाचे श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी आणि इतर मान्यवरांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी पद्मविभूषण यतिकुल चक्रवर्ती श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रतीकाचे अनावरण केले. त्यांचे भक्ती, ज्ञान आणि सेवा यांना समर्पित जीवन आजही असंख्य लोकांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वामीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम त्यांच्या उदात्त विचारांना पुढे घेऊन जातील.
एक्स या समाजमाध्यमांवरील आपल्या संदेशांत पंतप्रधान म्हणतात :
“उडुपी येथील श्री पेजावर अधोक्षज मठाचे श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची इतर मान्यवरांसह भेट घेतली.
पद्मविभूषण यतिकुल चक्रवर्ती श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रतीकाचे अनावरण करण्यात आले. त्यांचे भक्ती, ज्ञान आणि सेवा यांना समर्पित जीवन आजही असंख्य लोकांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम त्यांच्या उदात्त विचारांना पुढे घेऊन जातील.”
Met Sri Sri Vishwaprasanna Tirtha Swamiji of Sri Pejavara Adhokshaja Matha, Udupi, along with other dignitaries.
Unveiled the logo of the Birth Centenary Celebrations of Padma Vibhushan Yatikula Chakravarti Sri Vishwesha Tirtha Swamiji. His life of devotion, learning and service continues to inspire countless people. The various initiatives being undertaken in the run-up to his birth centenary will further carry forward his noble ideals.
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2026
माधुरी पांगे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai