Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र 4×400 मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेल्या संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आशियाई क्रीडा स्पर्धेत, मनू टीएस, पुवाम्मा एमआर, विशाल टीके आणि विध्या रामराज यांचे मिश्र 4×400 मीटर रिले प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी, या खेळाडूंचा वेग, समन्वय आणि जिद्द यामुळे ही शर्यत रोमांचकारक ठरली आणि भारतीय अॅथलेटिक्ससाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले आहे. भविष्यातही या खेळाडूंनी यशाची नवी शिखरे सर कऱण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये नमूद केले आहे-

“आमच्या मिश्र 4×400 मीटर रिले संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल मनू टी.एस., पूवम्मा एम.आर., विशाल टी.के. आणि विध्या रामराज यांचे अभिनंदन. या खेळाडूंचा वेग, समन्वय आणि जिद्द यामुळे ही शर्यत रोमांचकारक ठरली आणि भारतीय अॅथलेटिक्ससाठी हा अभिमानाचा क्षण होता.

त्यांनी भविष्यातही यशाची आणखी उंच शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”

***

NitinFulluke / VijaylakshmiSalvi / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai