Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून पारुल चौधरी हिचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पारुल चौधरी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, तिचे हे यश नवोदित खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे.  मोदी यांनी तिला भविष्यातील प्रयत्नांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

एक्स या समाजमाध्यमावर एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पारुल चौधरी हिचे मनापासून अभिनंदन. तिचे यश नवोदित खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. तिला पुढील प्रवासासाठी आणि प्रयत्नांसाठी खूप खूप शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai