Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विथ्या रामराजचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल विथ्या रामराजचे अभिनंदन केले.

ही खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी विथ्याचे अभिनंदन केले आणि भविष्यातही तिने यशाची नवनवीन शिखरे गाठत राहावीत अशी सदिच्छा व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“विथ्या रामराजची खरोखरच एक उत्कृष्ट कामगिरी! तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. विथ्याचे अभिनंदन. भविष्यातही ती यशाची नवनवीन शिखरे गाठत राहो, ही सदिच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai