Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

यूपीएससी शताब्दी समारंभाला संबोधित करताना पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक


नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

यूपीएससीच्या शताब्दी समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कॅप्टन स्मित मच्छार यांनी जगाला सर्वोच्च दर्जाचे धैर्य दाखवून दिले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कॅप्टन स्मित यांनी शौर्याने लढा दिला आणि 9/11 सारखा आणखी एक हल्ला रोखला.

मोदी म्हणाले की, 140 कोटी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार  यांना सलाम करतात आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत.

पंतप्रधानांनी X वर लिहिले:

“कॅप्टन स्मित मच्छार  यांनी जगाला सर्वोच्च दर्जाचे धैर्य दाखवून दिले आहे.

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी शौर्याने लढा दिला आणि 9/11 सारखा आणखी एक हल्ला होण्यापासून रोखले.

140 कोटी भारतीय कॅप्टन स्मित यांना सलाम करतात आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत.”

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai