पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
उपराष्ट्रपती थिरु सीपी राधाकृष्णन् यांनी अतिशय जिव्हाळ्याने दिलेल्या शुभेच्छा आणि कौतुकाचे बोल याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
लोकसेवेच्या या वाटचालीला भारतातील जनतेच्या विश्वासाने आणि सहभागाने प्रत्येक टप्प्यावर अधिक बळ दिले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांविषयी उपराष्ट्रपतींनी केलेले निरीक्षण अत्यंत प्रोत्साहनदायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘विकसित भारत’ चे आपले सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी आपण आणखी जास्त ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले:
“थिरू सी. पी. राधाकृष्णन जी, आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि केलेल्या कौतुकाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
लोकसेवेचा हा प्रवास भारतातील जनतेच्या विश्वासाने आणि सहभागाने प्रत्येक टप्प्यावर अधिक मजबूत झाला आहे.
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांविषयी आपण केलेले निरीक्षण अत्यंत उत्साहवर्धक आहे.
आपले विकसित भारताचे सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी मी आणखी नव्या ऊर्जेने कार्य करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. @VPIndia”
Thank you for your warm wishes and kind words, Thiru CP Radhakrishnan Ji.
This journey of service has been strengthened at every step by the trust and participation of the people of India.
Your observations from across the States and Union Territories are deeply encouraging.
I remain committed to working with even greater energy to realise our collective vision of a Viksit Bharat.
@VPIndia
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026
माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Thank you for your warm wishes and kind words, Thiru CP Radhakrishnan Ji. This journey of service has been strengthened at every step by the trust and participation of the people of India. Your observations from across the States and Union Territories are deeply encouraging. I remain committed to working with even greater energy to realise our collective vision of a Viksit Bharat. @VPIndia
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026