Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या एकेरी क्लास 1 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल जेहान दोराब मदान याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीच्या क्लास 1 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल जेहान दोराब मदान याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

भारताचे पॅरा टेबल टेनिस पथक सातत्याने देशाला अभिमान वाटावी अशी कामगिरी करत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे. हे यश जेहान दोराब मदान याचे या खेळावरील प्रचंड प्रेम आणि कौशल्याची प्रचिती देणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याने आगामी काळात यशाची नवीन शिखरे सर करत राहावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

“भारताचे पॅरा टेबल टेनिस पथक सातत्याने आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटेल अशी कामगिरी करत आहे.

जेहान दोराब मदान याने आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या टेबल टेनिस एकेरीच्या क्लास 1 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे. त्याचे हे यश त्याचे या खेळावरील प्रचंड प्रेम आणि कौशल्याची प्रचिती देणारे आहे.

आगामी काळातही तो अशीच यशाची नवीन शिखरे सर करत राहो हीच सदिच्छा : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai