Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या गोळाफेक F11 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण शर्मा याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक F11 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण शर्मा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

हे यश त्याच्या धैर्याची, तयारीची आणि समर्पणाची प्रचिती देणारे असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

“पुरुषांच्या गोळाफेक F11 या क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण शर्मा याचे अभिनंदन. हे यश त्याच्या धैर्याची, तयारीची आणि समर्पणाची प्रचिती देणारे आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला माझ्या शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai