Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रावण्णी वलसानैनीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत देशाला कांस्य पदक जिंकून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावण्णी वलसानैनीचे अभिनंदन केले आहे.

रावण्णी वलसानैनीने आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवत, हक्काने पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या कामगिरीतून रावण्णी वलसानैनीने देशाच्या पॅरा खेळाडूंची जिद्द आणि चिकाटीची प्रचिती येते असे म्हणत, त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

“सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आणि हक्काने पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर मिळवलेले स्थान!

रावण्णी वलसानैनीने आशियायी पॅरा  क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 1500 मीटर T11 स्पर्धेत देशाला कांस्य पदक जिंकून दिले. तिच्या या कामगिरीतून देशाच्या पॅरा खेळाडूंची जिद्द आणि चिकाटीची प्रचिती येते. तिचे अभिनंदन : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai